मिनी विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसांच्या पक्षासाठी सूचना जाहीर झाल्या आहेत. भाजप पुन्हा नंबर वन पक्ष झाला पाहिजे' असं म्हणतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पदाधिकारी आणि नेत्यांना निर्देश देण्यात आले आहेत. महायुतीला निवडून आणायचे, हेच उद्दिष्ट ठेवा... ट्रिपल इंजिन सरकार राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे भाजपच्या तब्बल अडीच तास झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. केंद्र व राज्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्या. असे आदेश देखील देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.