थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Dharashiv) धाराशिवमध्ये आदिवासी समाजाकडून तीव्र आंदोलन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावात सीरिँटिका पवनचक्की कंपनीविरोधात आदिवासी समाजाने आंदोलन सुरू केलं आहे.
महिला आक्रमक झाल्या असून महिलांनी थेट लाईटच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं आहे. पवनचक्की कंपनीकडून योग्य मोबदला न मिळाल्याचा आदिवासी समाजाचा आरोप असून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे.
कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून जमिनीचा योग्य मोबदला, नुकसानभरपाई मिळावी अशी आदिवासी समाजाची मागणी आहे.
Summary
धाराशिवमध्ये आदिवासी समाजाचं तीव्र आंदोलन
सीरिँटिका पवनचक्की कंपनीविरोधात आंदोलन
वाशी तालुक्यातील पारा गावात आंदोलन