थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Devendra Fadnavis Interview) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
मुलाखती होताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात गडकरी रंगायतन येथे मुलाखत घेतली जाणार असून या मुलाखतीत ठाणे शहराचा विकासाचा अजेंडा मांडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
ही मुलाखत वरिष्ठ पत्रकार मिलींद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान घेणार आहेत. या मुलाखतीमधून मुख्यमंत्री कोणते मुद्दे मांडतात याकडे लक्ष लागले आहे. मुलाखत संध्याकाळी 7 वाजता होण्याची शक्यता आहे.
Summary
ठाण्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत
मुलाखतीत ठाण्यातील विकासाचा अजेंडा मांडला जाणार
मुलाखत वरिष्ठ पत्रकार मिलींद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान घेणार