Sheetal Mhatre
Sheetal Mhatre  Team Lokshahi
महाराष्ट्र

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन राजकारण चांगलंच तापले असून याचे पडसाद विधीमंडळातही उमटलेले दिसून आले. याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. तर, शंभूराज देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात येत असल्याची घोषणाही विधीमंडळात केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

काय म्हणाले राज्य महिला आयोग?

शीतल म्हात्रे यांच्याबाबतीतचा व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना माध्यमांवरून ट्रोल करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिला वर्ग राज्यात सुरक्षित आहेत का हा प्रश्न आहे. महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. अशा प्रकरणांमध्ये सायबर गुन्हे विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई केल्यास त्याला वेळीच पायबंद होईल. म्हात्रे ह्यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी व यामागील नेमके सत्य समक्ष आणावे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे.

शंभूराज देसाई यांची घोषणा

शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर अशोक राजदेव मिश्रा, मानस कुंवर, विनायक डावरे, रविंद्र चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल करून स्त्रीची बदनामी करण्यात आली आहे. या प्रकरणी चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अश्लील व्हिडीओ व्हायरल करून एका स्त्रीबाबत असभ्य वर्तन केलं आहे. त्यामुळेच आम्ही या प्रकरणी एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

दरम्यान, व्हायरल व्हिडीओवर शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत पत्रकार परिषदेत बाजू मांडली. स्त्री म्हणून आज वेदना होत आहे. बोलण्यासारखं काहीही नसलं की चारित्र्यावर बोललं जातं. हा व्हिडिओ ठाकरे गटाच्या अनेक फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आला. या व्हायरल व्हिडिओ संदर्भात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 1 अंधेरीतील पदाधिकारी आणि दुसरा दहीसरमधील कार्यकर्ता आहे. तसेच या सर्व प्रकारामागील मास्टरमाईंड कोण आहे, तो शोधून काढावा, असे शीतल म्हात्रे यांनी म्हंटले होते.

Devendra Fadnavis : माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...