IPS Officers Transfers 
महाराष्ट्र

IPS Officers Transfer : महाराष्ट्रातील 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे बदली?

राज्यात पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे सत्र सुरु आहे.

Published by : Team Lokshahi

(IPS Officers Transfers) राज्यात पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे सत्र सुरु आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल 49 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये काल नुकत्याच झालेल्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. याआधी गृह विभागाने 27 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली जाहीर केली होती.

मुंबईतील पोलीस उपआयुक्त पदांसह राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक, उप आयुक्त आणि समादेशक अशा महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राजतिलक रोशन, राकेश ओला, समीर शेख यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना मुंबईत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

प्रमुख बदल्या खालीलप्रमाणे :

राकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर ➡पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड ➡ पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर

आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे ➡ पोलीस अधीक्षक, रायगड

महेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर ➡ पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर

योगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड ➡ पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

बच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला ➡ समादेशक, रा.रा. पो.बल, गट क्र. 4, नागपूर

अर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर ➡पोलीस अधीक्षक, अकोला

मंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई ➡ पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर

राजातिलक रोशन – सहायक पोलीस महासंचालक, मुंबई ➡पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

बाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघर ➡पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

यतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली ➡ पोलीस अधीक्षक, पालघर

सौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग ➡गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

मोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे ➡पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा ➡समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र. 9, अमरावती

निलेश तांबे – गुन्हे अन्वेषण, नागपूर ➡ पोलीस अधीक्षक, बुलढाणा

समीर शेख – पोलीस अधीक्षक, सातारा ➡पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई

तुषार दोषी – पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे ➡ पोलीस अधीक्षक, सातारा

सोमय मुंडे – पोलीस अधीक्षक, लातूर ➡पोलीस उप आयुक्त, संभाजीनगर परिमंडळ 1

जयंत मीणा – पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे ➡ पोलीस अधीक्षक, लातूर

नितीन बगाटे – उप आयुक्त, संभाजीनगर ➡पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

रितू खोकर – अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली ➡पोलीस अधीक्षक, धाराशिव

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा