Mangal Prabhat Lodha On Kabootarkhana Protest : 'आंदोलन करणारा जैन समाज नव्हता, बाहेरचे होते' Mangal Prabhat Lodha On Kabootarkhana Protest : 'आंदोलन करणारा जैन समाज नव्हता, बाहेरचे होते'
महाराष्ट्र

Mangal Prabhat Lodha : 'आंदोलन करणारा जैन समाज नव्हता, बाहेरचे होते'

मंगलप्रभात लोढा: दादर कबुतरखाना आंदोलनात बाहेरचे लोक, जैन समाज नव्हता.

Published by : Riddhi Vanne

Mangal Prabhat Lodha On Kabootarkhana Protest : कबुतरामुळे होणाऱ्या आजारांना लक्षात घेऊन महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत पालिकेने याचिका दाखल करत जो व्यक्ती कबुतरांना अन्न देईल अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. पालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री लावली होती. आज मात्र दादरमधील कबुतरखान्यावर मोठ्या प्रमाणात जैन समाज एकत्र आला आणि परिसरात ताण-तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जैन समाजाने आंदोलन करत पालिकेने लावलेली ताडपत्री काढली. याचपार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, "सकाळी दादर कबुतरखाना येथे झालेला प्रकार चुकीचा होता. माझे ट्रस्टसोबत बोलणे झाले, त्यावेळी समजले की, आंदोलनामध्ये बाहेरच्या लोकांचा समावेश होता. त्यामध्ये कोणत्याही जैन किंवा साधू समाज नव्हता. झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. लोकांनी कायदा हातात घेऊ नये, शांतात राखावी. "

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरु

Stock Market : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण; ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे गुंतवणूकदार चिंतेत

Baramati Crime : बारामतीत एसटीत एकावर हल्ला बळी मात्र दुसऱ्याचा, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Weather Update : राज्यासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे; 'या' भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता