महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीची छेड काढत टोळक्याची घरावर दगडफेक

Published by : Lokshahi News

रवी जयस्वाल, जालना | अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्याच घरावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातल्या आकणी गावात घडलीये.या घटनेचा व्हिडिओ लोकशाही न्यूजच्या हाती आलाय.

दिवाळीच्या सुट्ट्यात 13 वर्षीय मुलगी आपल्या मामाच्या गावी आली होती. दिवाळीच्या संध्याकाळी ती किराणा दुकानात पूजा करण्यासाठी आली होती.त्यानंतर ती पुजा संपवून परतत असताना संशयित आरोपी भागवत खणके याने तिला अडवून तिची छेड काढली. घडलेला सगळा प्रकार तिने तिच्या काकांना सांगितला असता याचा जाब विचारण्यासाठी गेले असता तिथे वाद झाला. त्यानंतर रात्री उशीरा आरोपी खणके याच्यासह 16 जणांच्या टोळक्यांनी अल्पवयीन मुलीच्या घरावर दगडफेक केली.. त्याचबरोबर बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही तोडफोड केलीये. त्यामुळं भयभित झालेल्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला असता 16 आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा