निसार शेख | जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. त्यानुसार आता ईडीने एका मागून एक बँकांना नोटीस पाठवायला सुरूवात केली आहेत. तर काही बॅंकांना पत्रही पाठवली आहेत. आता रत्नागिरी जिल्हा बँकेला ईडीचं पत्र आलं आहे. या वृत्ताला बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनीही दुजोरा दिला आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीचं पत्र आलं आहे. जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरणात हे पत्र आलं आहे. कशा पद्धतीने कर्ज पुरवठा करण्यात आला, तारण काय घेण्यात आलं आहे, आदी माहिती ईडीने मागितली असून, तसा ईमेल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आला आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला गेल्या महिन्यात 8 कोटी 75 लाखांचा कर्जपुरवठा केला आहे. दरम्यान आता ईडीने जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठ्यासंदर्भात माहिती मागविली आहे.