महाराष्ट्र

इस्रायलचा उल्लेख असलेला ‘अशी ही बनवाबनवी’ पाहा; जयंत पाटलांचा इस्त्रायलच्या अधिकाऱ्याला सल्ला!

Published by : left

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांची आज इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी (Kobi Shoshani) यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर कोबी शोशानी (Kobi Shoshani) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रेमाविषयी माहिती दिली. यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कोबी शोशानी (Kobi Shoshani) यांना 'अशीही बनवाबनवी' हा मराठी सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला. यासोबतच या मराठी सिनेमात इस्त्रायलचा उल्लेख असल्याचंही नमूद केलंय.

भारतीय सिनेसृष्टीची भुरळ पडलेले इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी (Kobi Shoshani) यांना भारतीय सिनेसृष्टीची क्रेझ आहे. कामानिमित्त जयंत पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या कोबी शोशानी (Kobi Shoshani) यांनी जयंत पाटलांना (Jayant Patil) भारतीय सिनेमाबाबत असलेल्या प्रेमाबद्दल सांगताच जयंत पाटलांनी त्यांना काही चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला.(Jayant Patil) जयंत पाटील (Kobi Shoshani) कोबी यांना 'अशीही बनवाबनवी' हा मराठी सिनेमा पाहण्याचा सल्ला देतानाच या मराठी सिनेमात इस्त्रायलचा उल्लेख असलेला व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

इस्त्रायलचा संबंध काय?

अशी ही बनवाबनवी या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदिता जोशी-सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, विजू खोटे यांच्यासारख्या एकापेक्षा एक कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटातील संवाद आजही लोकांना तोंडपाठ आहेत. सोशल मीडियावर आजही या सिनेमातील विदोनाचे मिम्स व्हायरल होत असतात. 'तुमचे 70 रुपये वारले' हा डायलॉग आणि इस्त्रायलचा किस्साही आजही चविने चर्चिला जातो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा