महाराष्ट्र

राष्ट्रवादीचं काय ठरलं? जयंत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत.

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अस्थिर झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार टिकावे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. या संकटात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आम्ही त्यांना शक्य ती सर्व मदत करू. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असे यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political Crisis Jayant Patil )

जयंत पाटील यांनी सांगितले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकांव अशी आमची इच्छा आहे. सरकार टिकवण्यासाठी आवश्यक ती मदत करावी असे राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलं. राज्याबाहेर गेलेले शिवसेना आमदार माघारी येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असल्याने त्यांना आमचा पाठिंबा असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला आहे, मुख्यमंत्रीपद सोडले नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. सरकारी कामकाज करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी ते वर्षा बंगल्यावर आले होते. त्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांसह सर्वांनी विनंती केल्यानंतर ते वर्षा बंगल्यावर वास्तव्यास आले होते, असेही पाटील यांनी सांगितले.

मुंबईतील शिवसेना आमदारांवर विश्वास होता

आज एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे आणखी चार आमदार सामील झाले. यामध्ये सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांचा समावेश आहे. सध्या गुवाहाटीत दाखल झालेले आमदार शिंदे गटासोबत संवाद साधत असावेत, तिकडे नेमकं काय सुरू आहे, याचा अंदाज घेण्यासाठी गेले असावेत. नेमकं ठोस सांगता येणार नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा