बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Jayant Patil) महापालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली.
यातच आता जयंत पाटील आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मातोश्री निवास स्थानी ही भेट घेणार असून ठाकरे बंधूंच्या युतीनंतर या भेटीला विशेष महत्त्व आहे. आज दुपारी साडेबारा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि मुंबई अध्यक्ष राखी जाधव या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत जाणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार असून या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summary
जयंत पाटील आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
ठाकरे बंधूंच्या युतीनंतर या भेटीला विशेष महत्त्व
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत जाणार का? सर्वांचे लक्ष