महाराष्ट्र

पिंपळगावातील सरफा दुकानात 2 लाख 70 हजारांची चोरी

Published by : Lokshahi News

साकोली येथील दोन सराफा दुकानातून पाच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असतानाच भंडाऱ्याच्या लाखनी लगतच्या पिंपळगाव येथील एका सराफा दुकानातून 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

त्यामुळे साकोलीनंतर आता लाखनीकडे चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे भंडारा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

लाखनी तालुक्यातील खैरी येथील लौकिक लालचंद रोकडे यांचे पिंपळगाव येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकांनाच्या शटरचे लॉक तोडून दुकानात प्रवेश करून वेगवेगळ्या शोकेसमधील दागिने लंपास केले असून 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. याची तक्रार लाखनी पोलिसात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी कणकवलीच्या मटका सेंटरवर टाकली धाड

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य