थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Justice Surya Kant) देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत. न्या. सूर्यकांत यांची 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशपदासाठी नियुक्ती जाहीर केली होती.
सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्यकांत यांचा 15 महिन्यांचा कार्यकाळ राहणार आहे. ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील. 15 महिने सरन्यायाधीश म्हणून काम करतील. सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा भर देशातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यावर राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
देशभरात 5 कोटी खटले प्रलंबित असून हेच सर्वात मोठे आव्हान असल्याचे न्या. सूर्यकांत म्हणाले. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत.
Summery
न्या. सूर्यकांत आज घेणार सरन्यायाधीश पदाची शपथ
देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ
5 कोटी प्रलंबित खटल्यांचं नव्या सरन्यायाधीशांपुढे आव्हान