कर्नाटक शासनाच्या कृष्णाकाठ योजना अंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फूट वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अलमट्टी धरणाची पाणी पातळी सध्या 519 पॉईंट 60 मीटर आहे.
उत्तर कर्नाटकातील दुष्काळ निवारण आणि सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी अलमट्टी धरणाची उभारणी करण्यात आली आहे. याविषयी बेळगावमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
अलमट्टी धरणामुळे सांगलीला महापुराचा धोका वाढत असल्याची भीती काही तज्ञांनीही व्यक्त केलेली आहे. कृष्णमहापूर नियंत्रण कृती समितीने ही याला विरोध केला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने कर्नाटकातील जमीन सिंचनाखाली येतील मात्र सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.