महाराष्ट्र

Kartiki Ekadashi : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

आज कार्तिकी एकादशी.

Published by : Siddhi Naringrekar

Kartiki Ekadashi Mahapuja : आज कार्तिकी एकादशी. यानिमित्त आज पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बबनराव घुगे आणि वत्सला घुगे या दांपत्याला मिळाला.

मराठा आरक्षणामुळे यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांनी येऊ नये अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली होती. त्यावर अनेक बैठका पार पडल्या. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हस्तक्षेप करत आंदोलकांची बैठक घेत यावर तोडगा काढला.

मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला. हे दाम्पत गेल्या 15 वर्षांपासून ते न चुकता वारी करतायत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवस आधीच पंढरपूरात आले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या