महाराष्ट्र

वर्धा हादरले! शाळेसमोरुन अपहरण करत धावत्या गाडीतच केला चिमुकलीवर अत्याचार

पुलगावातील घटनेने खळबळ; चाकूचा धाक दाखवून बसविले गाडीत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भूपेश बारंगे | वर्धा : जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असतानाच नराधम दोघांनी चिमुकलीला चाकूचा धाक दाखवून अपहरण केले व कारमध्ये बसवून धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, 13 वर्षीय पीडिता ही दररोजप्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती कारमध्ये वाहनात जबरदस्ती खेचत नेत बसवले. आणि अनोळखी युवकाने कार समोर नेली. पीडिता ही आरडाओरड करीत होती. पण, कारच्या काचा बंद होत्या. सुमेधने पीडितेवर धावत्या कारमध्येच बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेने सर्व आपबिती तिच्या घरच्यांना सांगितली असता आईने थेट पुलगाव पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने सुमेध आणि त्याच्या एका मित्राविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा केला आहे. व प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे. दोन्ही नराधम आरोपी पोलिसांच्या रडारवर असून लवकरच दोघांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज