महाराष्ट्र

महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण सावंत यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत बॉडीबिल्डिंग ॲण्ड फिजिक्स स्पोर्ट्स पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष किरण सावंत यांची महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

Published by : Sagar Pradhan

महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत बॉडीबिल्डिंग अॅण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष किरण सावंत यांची महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 27 फेब्रुवारी रोजी सिल्व्हर बॅक्वेट हॉल ताथवडे येथे झालेल्या महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र बॉडिबिल्डींग एक्झिक्युटिव्ह कमिटीची निवडणूक पार पडली. त्या सभेत अध्यक्षपदी किरण सावंत यांची सर्वांच्या समतीने निवड झाली.

सोबतच त्यामध्ये एकूण 22 जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी ही निवड करण्यात आली. किरण सावंत सरांचे बॉडिबिल्डींग या खेळाविषयी असलेली श्रद्धा व प्रेम तसेच आजपर्यंत त्यांनी या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांची सर्वानूमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ऍडव्होकेट कूमार सर यांनी रिट्ररर्निंग ऑफिसर म्हणून काम पाहिले तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ऑब्झर्वर म्हणून वर्ल्ड बॉडिबिल्डींग अण्ड फिजिक्स स्पोर्ट्स फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल चेतन पठारे यांनी काम पाहिले.

यावेळी वर्ल्ड बॉडिबिल्डींग असोसिएशनच्या लिगल ॲडव्हाईजर विक्रम रोठे तसेच साऊथ एशियन बॉडिबिल्डींग चे अध्यक्ष व महाराष्ट्र बॉडिबिल्डींगचे माजी अध्यक्ष प्रशांत आपटे सर उपस्थित होते. सदर निवडणूक कार्यकारणी समिती मध्ये एकूण ९ पदांसाठी निवड करण्यात आली व त्यामध्ये एकूण १७ पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. पिंपरी चिंचवड बॉडिबिल्डींग चे सरचिटणीस महेश गणगे यांनी आलेल्या सर्व पदाधिकारी स्वागत केले.

अशी आहे नवनियुक्त कार्यकारणी

अध्यक्ष: किरण सावंत - पिंपरी चिंचवड

उपाध्यक्ष: प्रशांत आपटे - ठाणे

अजय खानविलकर - मुंबई

राजेंद्र हेंद्रे - सातारा

सचिन टापरे - औरंगाबाद

गोपाळ गायकवाड - नाशिक

मोहन चव्हाण - जळगाव

सचिन डोंगरे - पश्चिम ठाणे

सरचिटणीस: राजेंद्र चव्हाण - ठाणे

सहसचिव : कूतूबूद्दीन सय्यद - औरंगाबाद

हेमंत खेबडे - नवी मुंबई

खजिनदार: सूनिल शेगडे - मूंबई सबर्रबन

संयोजन सचिव : राजेश वडाम - कोल्हापूर

मनोज गायकवाड - अहमदनगर

सूरज तेंडुलकर - सिंधुदुर्ग

मनिष नंद - परभणी

सदस्य : जफर खान - परभणी.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Ganpati Visarjan : गणपती विसर्जनासाठी मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

Latest Marathi News Update live : लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात

Pune Ganpati visarjan : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी

Ganpati visarjan 2025 : Rain Update : मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?