महाराष्ट्र

किरीट सोमय्यांवर अबू नुकसानीचा दावा केलाय- अनिल परब

Published by : Lokshahi News

निसार शेख | दापोलीतील साई रिसॉर्टशी माझा काडीमात्र संबंध नाही. याबाबत सरकारी अहवाल आला असताना सुद्धा त्या रिसॉर्ट बाबत माझा संबंध जोडून किरीट सोमय्या हे वारंवार माझी बदनामी करीत आहे. त्यामुळे सोमय्यांवर अबू नुकसानीचा दावा केला आहे, त्याचा निकाल येत्या महिन्यात येईल असे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

अनिल परब यांनी काही लोकांशी संगनमत करुन कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सीआरझेडचे उल्लंघन करुन खोटे बनावटी कागदपत्रे, पुरावे तयार करुन 22 डिलक्स खोल्यांचे 4 तारांकित 10 कोटी रुपयांचा रिसॉर्ट बांधला आहे अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होता.

दापोलीतील साई रिसॉर्टमध्ये माझा काडीमात्र संबंध नाही याबाबत सरकारी अहवाल आला असताना सुद्धा त्या रिसॉर्ट बाबत माझा संबंध जोडून किरीट सोमय्या हे वारंवार माझी बदनामी करीत आहेत याबाबत सोमय्या यांच्यावर अबू नुकसानीचा दावा हायकोर्टत केला आहे. एक तर त्यांना माझी माफी मागावी लागेल नाहीतर 100 कोटी द्यावे लागतील असे अनिल परब म्हणाले.

किरीट सोमय्या व भाजप हे दापोली व कोकण पर्यटन याच्यावर घाला घालत आहेत कदाचित त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणूकमध्ये भोगावे लागतील असे स्पष्ट मत अनिल परब यांनी मांडले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा