(Kolhapur Heavy Rain ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
राधानगरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. राधानगरीचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.