(Kolhapur Panchaganga River ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत.
यातच कोल्हापूरच्या पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पंचगंगेची पाणीपातळी 42 फूट 7 इंचावर पोहोचली असून 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर - पन्हाळा आणि कोल्हापूर शिये मार्गावर पुराचे पाणी आल्याने मार्ग बंद आहे.
कोल्हापुरातील पूरक्षेत्र असणाऱ्या सुतार वाडा इथल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले असून राधानगरीतून एकूण 4356 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपत्रात सुरू आहे.कोकणाकडे जाणारे मार्ग अद्याप बंदच असल्याची माहिती मिळत आहे.