(Kolhapur Rain Red Alert ) राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. आजही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर आता आजही कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 19 फूट 8 इंच आहे. राजाराम बंधाऱ्यासह 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पंचगंगा, कासारी, दूधगंगा आणि भोगावती नदीवरील 13 बंधारे पाण्याखाली गेलेत. पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.