सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मात्र पूरस्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात आलेलं पुराचे पाणी कमी झालं असून शहरातील मार्ग खुले करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने पंचगंगेच्या पुराची पातळी संत गतीने कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अद्यापही 84 बंधारे पाण्याखाली गेलेली आहेत. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडेच असून त्यातून 4356 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. पुराचे पाणी संथ गतीनं ओसरत असल्याने मार्ग हळूहळू देखील खुले करण्यात येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरासह करवीर तालुका आणि शिरोळ तालुक्यातील शाळांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.