सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे पंचगगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी नोंद झाली आहे.
आज कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील तब्बल 75 बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे. राधानगरी धरण 73टक्के भरलं असून राधानगरी धरणातून 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगेची पाणीपातळी 35 फूट पाच इंचावर गेली असून 75 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.