(Kolhapur Rain ) कोल्हापूर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून सध्या ती 29 फूट 6 इंचावर पोहोचली आहे. राजारामसह 19 बंधारे अद्यापही पाण्याखाली गेल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली आहे मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
गतवर्षीच्या तुलनेत धरणात अधिकचा साठा असल्याने भविष्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेता धरणातून अद्यापही विसर्ग सुरूच असून आज राधानगरी धरणात 63% पाणी साठा आहे.
कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्राबाहेर गेली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली 29 फूट 6 इंचावर असून पहिल्याच पावसात पंचगंगा नदी पात्राबाहेर गेली आहे. कोल्हापूर शहरात पावसाची उसंत असली तरी देखील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम आहे.