महाराष्ट्र

कोल्हापूर पाणीपुरवठा प्रश्न ऐरणीवर! अभियंताच्या घरासमोर अंघोळ करत आंदोलन

Kolhapur Water Problem : कोल्हापूरकर आंदोलन करतानाही खास कोल्हापुरी स्टाईल जपताना दिसत आहे.

Published by : Team Lokshahi

कोल्हापूर : कोल्हापूरकर आंदोलन करतानाही खास कोल्हापुरी स्टाईल जपताना दिसत आहे. कोल्हापुरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते विजय देसाईंनी जलअभियंत्याच्या घरासमोर अंघोळ करत आंदोलन केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या पाणीपुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या घराबाहेर अंघोळ करुन पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या समस्येकडं लक्ष वेधलं आहे.

उद्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जलअभियंत्यांच्या घराबाहेर सामूहिक अभ्यंगस्नान आंदोलन करणार असल्याचं देखील यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांकडून जाहीर करण्यात आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Guru Purnima 2025: 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु...'; गुरुपौर्णिमा दिनानिमित्त आपल्या गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Chhatrapati Sambhajinagar : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप; 375 गावांमध्ये 'अर्ज द्या, कर्ज घ्या' उपक्रम राबवला