थोडक्यात
कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरेंना नोटीस
2 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश
कोरेगाव भीमा आयोगाची कारणे दाखवा नोटीस
(Uddhav Thackeray) कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरेंना नोटीस आली आहे. 2 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून कोरेगाव भीमा आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
याच्याआधी दोन वेळा म्हणजे 12 सप्टेंबर आणि 27 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठविण्यात आली होती मात्र, त्यावर कोणताही प्रतिसाद देण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे. 
कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आयोगाला सादर करण्यासाठी दोन नोटीसा बजावण्यात आल्या होत्या ते ठाकरे यांनी सादर केले नाही. त्यामुळे तुम्हाला जामीनपात्र अटक वॉरंट का जारी करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस आता आयोगाने उद्धव ठाकरे यांना बजावली आहे.