बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Krishnaraj Mahadik ) भाजपचे राज्यसभा खासदार धनंज महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 3 मधून कृष्णराज महाडिक हे लढणार असल्याची चर्चा रंगली आहे.
उद्या भाजपची यादी घोषित केली जाणार आहे. कृष्णराज महाडिक हे सोशल मीडियावर सक्रिय असून याच्याआधीसुद्धा कृष्णराज महाडिक यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली होती. त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही.
मात्र आता कृष्णराज महाडिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता कृष्णराज महाडिक यांच्या नावाची अधिकृत घोषणा कधी होणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
कृष्णराज धनंजय महाडिक निवडणुकीच्या रिंगणात
कोल्हापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 3 मधून लढणार
महाडिक कुटुंबाची नवी पिढी अखेर राजकारणात सक्रिय