जम्मू-काश्मीर कुलगाम येथे सुरक्षा दलाने तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम येथील मिरहमा परिसरात सुरक्षा दलाला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन जारी केलं. सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळाबार केला. या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये बुधवारी चकमक झाली. यामध्ये तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सर्च ऑपरेशन अद्याप सुरु आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.