कॉमेडिअन कुणाल कामरा हा नेहमी आपल्या हटके वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. कुणालनं आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून टोमणा लगावला आहे. फडणवीस दररोज पहाटे ४ वाजता उठून तयार होऊन राज्यपालांना फोन करतात, असा टोला कुणालनं लगावला आहे.
'जर तुम्हाला आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे, असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की, देवेंद्र फडणवीस रोज पहाटे ४ वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करून विचारतात, मी पुन्हा येऊ का', असं खोचक टि्वट कुणाल कामरानं केलं आहे.
राज्यातील सत्तास्थापनेचा संदर्भ देत कुणालनं हे टि्वट केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटे राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अवघ्या काही दिवसात अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला. याचाच संदर्भ देत कुणालनं फडणवीसांना टोला लगावला आहे.