महाराष्ट्र

Mumbai Building Collapse | कुर्ला इमारत दुर्घटना, एकनाथ शिंदेंकडून पाच लाखांची मदत जाहीर

Published by : Shweta Chavan-Zagade

मुंबईतील कुर्ला पूर्व, शिवसृष्टी रोड वरील एका खासगी इमारतीचा काही भाग मध्यरात्री ( Mumbai Building Collapsed ) कोसळला. अग्निशमन दलाने १२ जणांना बाहेर काढले असून, 20 ते 25 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) या दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. तसंच बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांनी ही मदत जाहीर केली आहे.

कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून मंगेश कुडाळकर ( Mangesh Kudalkar ) यांनी मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपयांची मदत तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली. मंगेश कुडाळकर हे सध्या बंडखोरांच्या गटात गुवाहाटीला आहे.

१२ जण सुखरूप : कुर्ला पूर्व, नाईक नगर सोसायटी, शिवसृष्टी रोड येथील कलेक्टर यांच्या जागेवरील एका खासगी इमारतीचा काही भाग रात्री 11.50 च्या सुमारास कोसळला. या इमारतीचा भाग दुसऱ्या इमारतीवर पडला आहे. इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्या खाली 25 ते 25 लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 फायर इंजिन तसेच 2 रेस्क्यू वाहने घटनास्थळी दाखल झाले असून, १२ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

विशाल पाटील यांच्या बंडखोरीचा फटका चंद्रहार पाटील यांना बसण्याची शक्यता

भाजप नेत्यांकडून आज राज्यात सभांचा धडाका

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य