LADKI BAHIN YOJANA: CM DEVENDRA FADNAVIS CONFIRMS SCHEME CONTINUATION, PENDING PAYMENTS SOON 
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: देवाभाऊंची मोठी भेट! लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची घोषणा, लाभार्थी महिलांना मोठा दिलासा

Beneficiary Update: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. योजना बंद होणार नसून, केवायसी पूर्ण केलेल्या पात्र महिलांना डिसेंबर व जानेवारीचे रखडलेले हप्ते लवकरच मिळणार आहेत,

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा १,५०० रुपये सन्मान निधी दिला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे (नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुका) नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते रखडले होते. मात्र, नोव्हेंबरचा हप्ता आता लाभार्थी महिलांना वितरित करण्यात आला असून, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे लवकरच मिळणार आहेत.

या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र नसलेल्या महिलांची नावे यादीतून वगळण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. ३१ डिसेंबर २०२५ ही केवायसीची शेवटची मुदत होती, पण ती उलटून गेली तरी अनेक महिलांची केवायसी बाकी आहे. अशा महिलांचे नावे यादीतून काढली जाणार असून, पात्र नसलेल्या महिलांचाही लाभ बंद होईल.

केवायसी प्रक्रियेमुळे काही महिलांची नावे आधीच वगळण्यात आली आहेत. यावरून विरोधकांनी योजना बंद होणार असल्याचा आरोप केला असून, लाडक्या बहिणींनाही शंका निर्माण झाली आहे. जालना येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट प्रतिक्षेप दिला. "लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. उलट, लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे," असे त्यांनी घोषित केले.

महिला सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची असून, लाखो महिलांना त्याचा लाभ मिळत आहे. केवायसी पूर्ण करणाऱ्या पात्र महिलांना नियमित हप्ते मिळत राहतील, असे सरकारकडून सांगितले जात आहे.

  • लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

  • नोव्हेंबरचा हप्ता वितरित झाला असून डिसेंबर व जानेवारीचे हप्ते लवकरच मिळणार.

  • पात्र महिलांसाठी ई-केवायसी अनिवार्य असून अपूर्ण केवायसीमुळे काही नावे वगळली गेली आहेत.

  • या योजनेतून महिलांना आर्थिक बळ देत ‘लखपती दीदी’ बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा