थोडक्यात
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी
सप्टेंबर महिन्याचे 1500 हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता
हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग
(Ladki Bahin Yojana ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याची हप्ता अजून आला नसून महिला या हप्ताची वाट पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असून सप्टेंबर महिन्याचे 1500 हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी रुपये वर्ग करण्यासंदर्भात शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आला असून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग केले आहेत.
सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आता लवकरच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम शासनाकडून देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.