थोडक्यात
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी
आजपासून सप्टेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा होणार
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती
(Ladki Bahin Yojana ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याची हप्ता अजून आला नसून महिला या हप्ताची वाट पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असून सप्टेंबर महिन्याचे 1500 हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी रुपये वर्ग करण्यासंदर्भात शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आला असून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.'
'महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती!'असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.