थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
लाडकी बहीण योजनेत लाखो लाभार्थी महिलांची केवायसी अद्याप बाकी असून, ३१ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करणे अनिवार्य झाले आहे. ज्या महिलांनी केवायसी केली असली तरी त्यात चूक असल्यास लाभ बंद होण्याचा धोका असल्याने, सरकारने चूक सुधारण्याची एकदाच संधी उपलब्ध करून दिली आहे. ही सुधारणा करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर नवीन पर्याय जोडण्यात आला असून, ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.
सुधारणेसाठी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. सर्वप्रथम वेबसाइटवर जाऊन होमपेजवरील "ईकेवायसी करताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम येत असल्याने चूक झाल्यास" https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
त्यानंतर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक केल्यास आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. ज्यामुळे तुमच्यासमोर फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये चुकीची माहिती एडिट करून योग्य तपशील भरा, प्रश्नांची उत्तरे द्या आणि सबमिट करा. यामुळे केवायसी सुधारित होईल. या सुधारणेची संधी फक्त एकदाच मिळेल, त्यामुळे १५ दिवसांत हे काम पूर्ण करा. लाखो लाडक्या बहिणींनी त्वरित कृती करून लाभ सुरक्षित ठेवावा, अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहिण योजनेत चूक झालेल्या ईकेवायसीची सुधारणा करण्याची संधी
३१ डिसेंबर पर्यंत या प्रक्रियेची पूर्ण करा, अन्यथा लाभ थांबवला जाऊ शकतो
लाखो महिलांनी त्वरित क्रिया करून आपला लाभ सुरक्षित करावा.