महाराष्ट्र

लखीमपूर हिंसाचार; गडचिरोलीत काँग्रेसचे रस्त्यावर उतरून आंदोलन

Published by : Lokshahi News

व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली | उत्तरप्रदेशातील लखीमपुरमध्ये झालेल्या हिंसाचार विरोधात गडचिरोलीत काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अडवण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला. तसेच लखीमपुर घटनेतील दोषी मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करून योगी सरकार बरखास्तीची मागणी केली.

लखीमपुर हिंसाचार घटने विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गडचिरोलीच्या गांधी चौकात केंद्र आणि योगी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनावेळी भाजपने जनरल डायरलाही लाजवेल अशी कृती केल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अडवण्याचा कृत्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला. तसेच लखीमपुर घटनेतील दोषी मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करून योगी सरकार बरखास्तीची मागणी केली.

प्रकरण काय ?

लखीमपूर हिंसाचारात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर, मारले गेलेले इतर चार जण हे भाजपा कार्यकर्ते असल्याचं समोर आलंय. याशिवाय एका स्थानिक पत्रकाराचा देखील या घटनेत मृत्यू झाला आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष मिश्राच्या अटकेची शेतकरी नेत्यांनी मागणी केली होती. दरम्यान, आशिष मिश्रासह शेतकऱ्यांविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर