लालबागच्या राजाचा यावर्षीचा ८८वा गणेशोत्सव यंदा मंडळातर्फे शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ ते रविवार १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे. आज मंगळवार सकाळी सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.
लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाद्यपूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली.
गेल्या वर्षी कोविड 19च्या संसर्गामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने "आरोग्य उत्सव" साजरा करून आदर्श निर्माण केला होता.
यंदा गणेश भक्तांच्या विनंती वरून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचने नुसार गणेशोत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.