बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mahayuti Meeting ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून् 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
यातच भाजप-शिवसेनेच्या 200हून अधिक जागांचा तिढा सुटल्याची माहिती मिळत आहे. जागावाटपासंदर्भात अनेक बैठका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर वर्षा निवास स्थानी जागा वाटपाबाबत काल रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मंत्री उदय सामंत, राहुल शेवाळे हे या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत मुंबईच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत असून याच बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा आज सुटणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
वर्षा निवासस्थानी जागा वाटपावर रात्री उशिरा चालली बैठक
मंत्री उदय सामंत, राहुल शेवाळे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
मुंबईच्या जागा वाटपाबाबत देखील केली चर्चा