(Latur Rain Update) आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
यातच लातूरमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील बहुतांश भागात पाणी साचलं आहे. लातूरच्या जुना गाव परिसरात पावसामुळे प्रचंड नुकसानही झालं असल्याची माहिती मिळत आहे.
अनेक वाहने देखील पाण्यात वाहून गेली आहेत, छोट्या रस्त्यांना नदीचं रूप आले आहे. गल्ल्यातील रस्ते दुथडी भरून वाहत आहेत. अनेक घरात पाणी शिरले असून संसारपयोगी साहित्यांचं मोठं नुकसान झालं आहे.