आजच्याच दिवशी म्हणजे जेष्ठ शुध्द त्रयोदशी ला राजगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला होता. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाला होन किंवा शिवराई होन या सुवर्णमुद्रेला सुरुवात केली होती. मात्र महाराजांच्या मृत्यू नंतर मुघलांनी हे होन नष्ट केले. आजच्या घडीला फक्त 7 ते 8 होन शिल्लक असल्याचं सांगितलं जातं. यातील काही म्यूजियम मध्ये तर काही खाजगी लोकांकडे आहेत. यातील एक होन चंद्रपूर चे कॉइन संग्राहक अशोक ठाकूर यांच्याकडे असून त्यांनी या होन बाबत आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबाबत अतिशय रंजक माहिती सांगितली आहे.