महाराष्ट्र

संसद टीव्हीप्रमाणे विधिमंडळ टीव्ही सुरू होणार; राहुल नार्वेकरांची माहिती

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संसद टीव्हीप्रमाणे विधिमंडळ टीव्ही सुरू करण्याची माहिती दिली आहे, ज्यामुळे लोकांना विधिमंडळाच्या कामकाजावर थेट पाहता येईल. हिवाळी अधिवेशनापर्यंत ही टीव्ही वाहिनी सुरू होईल.

Published by : shweta walge

संसद टीव्हीप्रमाणे विधिमंडळ टीव्ही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. ज्यामुळे लोकांना विधिमंडळाच्या कामकाजावर थेट पाहता येईल. पुढील हिवाळी अधिवेशनापर्यंत ही टीव्ही वाहिनी सुरू होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले की,

संसद टीव्ही ही भारतातील एक सरकारी दूरदर्शन वाहिनी आहे. ती संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कार्यक्रम आणि इतर सार्वजनिक घडामोडींचे कार्यक्रम प्रसारित करते. मार्च २०२१ मध्ये विद्यमान गृह वाहिन्या, लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांचे एकत्रीकरण करून त्याची स्थापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ टीव्ही नेटवर्क सुरू करणार असल्याच त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, आजघडीला खासगी वाहिन्या विधिमंडळ कामकाजाचे प्रसारण करतात, पण विधिमंडळ टीव्ही सुरू झाल्यावर आम्ही त्यांना लाइव्ह फीड देऊ, येणाऱ्या काळात विधान भवन परिसराचा विस्तार करण्यात येईल. विधिमंडळ परिसरात सेंट्रल हॉलची नितांत गरज आहे. मात्र विस्तारासाठी जागा कमी पडत आहे. भविष्यातील विस्तारासाठी सोयीस्कर जागा संपादित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर काम सुरू असल्याच ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा