प्रशांत जगताप । कराड तालुक्यातील साजूर या गावी एका शेतात मंगळवारी सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. या मृत बिबट्याचा मृत्यू निमोनियामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित मृत बिबट्यास प्रचंड ताप आला असल्याने तो मागील चोवीस तासापासून एकाच जागेवर शेतात पडून होता. मंगळवारी सकाळी ही घटना समोर आली मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. निमोनियामुळेच बिबट्याला ताप आला असावा अशी माहिती वनविभागाचे अधिकारी विलास काळे यांनी दिली आहे.