थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nagpur Bibtya) राज्यात अनेक ठिकाणी मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. यातच आता पुणे शहरात पुन्हा बिबट्याचा वावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच आता नागपूरच्या पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत असून बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये बिबट्या दिसून आला होता, मात्र त्यावेळेस सर्चिंग केल्यावर बिबट्या सापडला नाही.
त्याच बिबट्याने आज पहाटे दोन पेक्षा अधिक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून दोन ते तीन जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
Summery
नागपूरच्या पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ
बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती
परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात