महाराष्ट्र

परमबीर सिंहांवरच लेटरबॉम्ब; करिअर उद्ध्वस्त केल्याचा पोलीस अधिकाऱ्याचा आरोप

Published by : Lokshahi News

बहुचर्चित मनसुख हिरेन आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांसह स्कॉर्पिओ प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करून होमगार्डचे महासंचालक पदी बसविण्यात आले. मात्र, नाराजी व्यक्त करत परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बच्या माध्यमातून गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केल्यानंतर आता एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना पत्र पाठवून नवा लेटरबॉम्ब टाकला आहे. त्यामुळे परमबीर सिंह हे अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.

अनुप डांगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री देशमुखांना लिहिलेलं पत्र.

चुकीचे आदेश देऊन आपल्या ओळखीच्या निकटवर्तियांवर गुन्हा दाखल करू नये, असा दबाब गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना अनुप डांगे यांच्यावर परमबीर सिंग यांनी टाकला. मात्र, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी यांची परमबीर सिंग यांची ४ जुलै २०२० मध्ये साऊथ कंट्रोल रूमला बदली केली. नंतर १८ जुलै २०२० मध्ये थेट अनुप डांगे यांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर न्यायासाठी अनुप डांगे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर पुन्हा आज देखील त्यांनी पत्र पाठवून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या आणि मोक्का कायदा अंतर्गत शिक्षा झालेल्या आरोपीसोबत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे कसे घरोब्याचे संबंध आहेत. त्याबाबत सविस्तर माहिती त्यांनी पत्रातून दिली आहे. तसेच खाकीवर हात उचलणाऱ्यांवर परमबीर सिंग कसं बळ देतात, तर शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवणाऱ्या पोलिसाला निलंबित करून कशाप्रकारे त्याचे करिअर बरबाद केलं जाते याची इत्थंभूत माहिती पत्रातून डांगे यांनी दिली आहे. त्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार आणि निलंबित पोलीस अधिकाऱ्याला न्याय मिळवून देणार का? याकडे लक्ष आहे.

गावदेवी पोलीस ठाण्याच्या पोलिसाला मारहाण झाल्याच्या प्रकरणात सहआरोपी असलेले चित्रपट निर्माते भरत शहा व त्यांचा मुलगा राजीव यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने डिसेंबर २०१९मध्ये अटकपूर्व जामीन मंजूर केला.
दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई रोडवरील 'डर्टी बन्स' या पबमध्ये काही दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळेस दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी नाईट राउंडला अनुप डांगे होते. त्यांनी लेट नाईट सुरू असलेल्या पबबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने धमकावण्यात आले होते. गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस तिथे पोहचले असता, भरत शहा यांचा नातू यश याने पोलिसाला मारहाण केली, असा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून यश व अन्य दोन जणांना अटक केली. त्यानंतर भरत शहा (७५) व त्यांचा मुलगा राजीव (५५) पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनीही पोलिसांविषयी अर्वाच्च भाषा वापरली आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, अशा आरोपाखाली पोलिसांनी आणखी एक गुन्हा नोंदवला. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असल्याने या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. 'पोलीस हे यश व अन्य दोघांना अमानवी पद्धतीने मारहाण करत होते. त्यावेळी संबंधित पोलीस अधिकारीच आक्रमकपणे वागत होता आणि उलट आमच्याविरुद्धच गुन्हा नोंदवण्यात आला', असा आरोप शहा पितापुत्रांनी अर्जात केला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jayakwadi Dam : मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार! जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढला

Latest Marathi News Update live : उद्धव ठाकरे आझाद मैदानावर दाखल

Bollywood Crime News : अभिनेत्रीला मोठा धक्का! पर्सनल सेक्रेटरीला अफरातफरीच्या आरोपाखाली अटक

Sanjay Raut : गिरणी कामगारांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल