आज माहाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प 2022-23 ह्या आर्थिक वर्षासाठी सादरप केला गेला. कोरोना हा साथीचा रोग पसरल्यापासून सर्वच क्षेत्रांना कोरोनाचा चांगलाच फटका बसल्याचा पाहायता मिळतंय. शिक्षण क्षेत्रावरदेखील कोरोनाचा मोठा परीणाम झालेला पाहायला मिळालाय. हीच गोष्ट लक्षात घेता अजित पवारांनी शिक्षणक्षेत्राला बळकट करता यावे ह्याकरीता उच्च व तंत्रशिक्षण विभागाकरीता 1160 कोटी तर शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली.
शिक्षण विभागासाठी नेमक्या काय घोषणा?