महाराष्ट्र

धक्कादायक! फी भरण्यावरून संस्थाचालकाच्या मुलाने केली पालकाला मारहाण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अनिल साबळे | औरंगाबाद : शाळेची फी भरण्याच्या कारणावरून मुजोर शाळेच्या संस्थाचालकाच्या मुलासह कर्मचाऱ्यांनी मुलासह पालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. सिल्लोड शहरात हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. कोणतेही कारण व अर्ज नसताना विद्यार्थ्यास टीसी दिल्याचेही समजत आहे.

सिल्लोड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून खासगी शिक्षण संस्थांची मोठी दादागिरी सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात मुजोरी करीत शालेय विद्यार्थ्यांसह पालकाचे आर्थिक शोषण केले जात आहे. वेळ प्रसंगी विद्यार्थ्यांसह पालकांना अपमानास्पद वागणूक व शिवीगाळ केली जाते. काल एका पालकाला फीस भरण्याच्या कारणावरून संस्थाचालकाच्या मुलासह कर्मचाऱ्यांनी जोरदार मारहाण केली व टीसी दिला आहे. याप्रकरणी पालकाने सिल्लोड शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना शहरातील लिटिल वंडर इंग्रजी शाळेत घडली आहे.

लिटिल वंडर इंग्रजी शाळेतील संस्था चालकाकडून मुजोरी करीत पालकाचे आर्थिक शोषण केले जाते. फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्याना दररोज उघड्यावर बसविले जाते. विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक त्रास व अपमानास्पद वागणूक दिला जाते. तसेच, संस्थेच्या दुकानातून शालेय साहित्य व कपडे घेण्यासाठी दबाव निर्माण करत आर्थिक शोषण केले जाते. याशिवाय विद्यार्थ्याचे शैक्षणिक भविष्य उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जातात. तालुक्यातील मुजोर शिक्षण संस्थावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...