महाराष्ट्रात वाढता कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी आज रात्री आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. यासाठी पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी जनतेला घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.
या लॉकडाऊमध्ये अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार असून पुढील १५ दिवस राज्यभरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.