Eknath shinde | devendra Fadnavis  Team Lokshahi
राजकारण

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळात 23 मंत्र्यांची पडणार भर, वनमंत्र्यांनी दिली माहिती

उपमुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री सध्या कार्यरत असून, आणखी 23 मंत्र्यांची निवड होणार

Published by : Sagar Pradhan

राज्यात अभूतपूर्व गोंधळानंतर नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. शिंदे गटातील अनेक आमदारांनी यावर मंत्रीपद न मिळाल्याने विरुद्ध दर्शवला. विरोधकांनी सुद्धा यावर तोंडसुख घेतलं. आता मात्र, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता असून, त्यात 23 नव्या मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती राज्याचे वनमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

काय म्हणाले वनमंत्री ?

राज्यात गणोशोत्सवानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आता रंगली आहे.त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त 18 मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. अजून यात 23 जणांची भर पडू शकते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. सूत्रानुसार, या विस्तारात एकनाथ शिंदे गट, भाजपा आणि अपक्ष यांतील काही जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

पुढे मुनगंटीवार म्हणाले की, सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत 15 टक्के मंत्री करता येतात. त्यानुसार राज्यात 43 जणांचे मंत्रिमंडळ करण्याला मुभा आहे. यापैकी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री सध्या कार्यरत असून, आणखी 23 मंत्र्यांची निवड केली जाऊ शकते. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. हा विस्तार येत्या काही दिवसात लवकरच होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

अनेक जणांची नाराजी दूर होणार?

एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर सुमारे महिनाभराने राज्याच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला होता. परंतु शिंदे गटातील काही महत्त्वाच्या नेत्यांना संधी न मिळाल्याने ते नेते नाराज असल्याचे त्यांनी उघडपणे बोलून दाखवली. त्यामुळे या विस्तारात नाराजी दूर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोबतच बंडाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचाही विचार यात करण्यात आला आहे.

विरोधकांचा टीकेनंतर महिलांना मिळणार स्थान

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्यामुळे विरोधकांनी चांगलीच टीकेची झोड उठवली होती. त्यावेळी दुसऱ्या मंत्रिमंडळात महिलांना संधी देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणत्या महिला नेत्यांना संधी मिळणार, हे बघणं महत्वाचे ठरेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या