राजकारण

भाजपवर शोककळा! 3 महिन्यात तीन लोकप्रतिनिधी गमावले

राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच, भाजपला पुण्यातून तीन महिन्यात तीन धक्के बसले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच, भाजपला पुण्यातून तीन महिन्यात तीन धक्के बसले आहे. भाजपचे तीन लढवय्य्या नेत्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भाजपवर शोककळा पसरली आहे. आमदार मुक्ता टिळक, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर आज गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या तीनही नेत्यांचे गंभीर आजाराने निधन झाले आहे.

मुक्ता टिळक यांची 57 व्या वर्षी प्राणज्योत प्रदीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली होती. मुक्ता टिळक कॅन्सरशी लढा देत होत्या. परंतु, 22 डिसेंबर 2022 रोजी त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरली. मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांची पणतू सून होत्या. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार होत्या. त्या ४ वेळा नगरसेवक राहिल्या होत्या. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअर अ‍ॅम्ब्युलन्सनं नेण्यात आलं होतं.

लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी 59 व्या वर्षी निधन झाले होते. १९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला. जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

तर, आज गिरीश बापट यांचे 72 व्या वर्षी निधन झाले आहे. नगरसेवकपदांपासून राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले होते. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद भूषविले. सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सचोटीने पार पाडल्या. आजारी असूनही गिरीश बापट कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ मैदानात उतरले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली