Narendra Modi  
राजकारण

Hanuman Chalisa : मोदी सरकारची 8वी वर्षपुर्ती; हनुमान चालीसाच पठण होणार

मंदिरामध्ये पुजा यज्ञ आणि हनुमान चालिसा पठण करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे

Published by : left

राज्यात हनुमान चालिसावरून राणा दाम्पत्य आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये संघर्ष पेटला असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 8 व्या वर्षपुर्तीनिमित्त हनुमान चालिसाचं पठण करण्यात येणार आहे.

राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिल्याने त्यांच्याविरोधात कलम १५३ अ बरोबरच विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून शनिवारी अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे राज्यात हनुमान चालीसावरून राजकारण तापले आहे. त्यात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पत्रकार परीषद घेत हनुमान चालीसावरून आक्रमक पावित्रा घेतला. हनुमान चालिसाचे पठण केल्याने राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर मी ही म्हणतो, असे म्हणत त्यांनी भरसभेत हनुमान चालिसा म्हटली.

येत्या 26 मे ला मोदी सरकारला 8 वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्त मंदीरामध्ये पुजा यज्ञ आणि हनुमान चालिसा पठण करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा