महाविकास आघाडीच्या ED विरोधी आंदोलनात शिवसेना नेत्यांची गैरहजरी 
राजकारण

Nawab Malik ED Arrest | महाविकास आघाडीच्या ED विरोधी आंदोलनात शिवसेना नेत्यांची गैरहजरी

Published by : Shweta Chavan-Zagade

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलानालय (ईडी) कडून अटक करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने मलिक यांना ८ दिवसांची ३ मार्चपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान ईडीच्या (ED) मनमानी कारभाराविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मंत्रालयानजीकच्या गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे नेते सकाळपासूनच धरण आंदोलनाला बसले आहेत. पण या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रसचे नेतेचे नेते आहेत. मात्र शिवसेना (shivsena) नेत्यांच्या अनुपस्थिती असल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) मंत्रालयानजीकच्या गांधी पुतळ्याजवळ बड्या नेत्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यासारख्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावली. पण शिवसेनेच्या नेत्यांची गैरहजेरी अनुपस्थितीचा विषय मात्र गाजला.

तासाभरानंतर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे, आमदार सुनिल राऊत तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई हे तासाभरानंतर आंदोलनाच्या ठिकाणी दिसले. शिवसेना नेत्यांच्या अनुपस्थितीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामध्ये शिवसेनेचे बड्या नेत्यांची गैरहजेरी अधिक गाजत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांवर सातत्याने प्रहार करणारे शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत आंदोलनाच्या ठिकाणी दिसले नाहीत. तर राज्याचे परिवहन मंत्री आंगणेवाडी यात्रेनिमित्त सिंधुदुर्गात आहेत. तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असल्याचे कळते. कार्यक्रम अचानक ठरल्याने ही अनुपस्थिती असल्याची प्रतिक्रिया आमदार सुनिल राऊत यांनी दिली.

शिवसेना नेत्यांमध्ये काही नेते हे कोकणात भराडी देवी यात्रेला गेले आहेत. तर आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी, संजय राऊत, एकनाथ शिंदे, उदय सामंत हे उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या निवडणुकांमुळे व्यस्त आहेत. काही नेते मणिपूरच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात आहे. या कार्यक्रमाची घोषणा ही अचानक झाल्याने शिवसेना नेत्यांची संख्या दिसत नाही. मुंबईतील शिवसेनेचे नेते दुपारपर्यंत हजर होतील, असेही सुनिल राऊत म्हणाले. कोणतेही प्रश्न उपस्थित करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडींने याठिकाणी नेते येण्यासाठी उपस्थित होण्यासाठी उशिर होत आहे, असेही कायंदे यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय